न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात हॅरी ब्रूकने नावावर केला मोठा विक्रम, सचिन-विराटलाही नाही जमलं ते केलं
इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटी न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात हॅरी ब्रूकने शतक ठोकलं. या शतकासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम मोडणं सचिन-विराटलाही जमलं नाही.