आयसीसीने काही दिवसांपूर्वी वनडे वर्ल्ड कपमधील 9 सामन्यांच्या तारखा बदलल्या. त्यानंतर आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडे वेळापत्रक बदल करण्याबाबत विनंती केली आहे. याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.
वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही असं बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलंय. राजीव शुक्ला हे स्वत: हैदराबादमध्ये होणाऱ्या सामन्यांचे प्रभारी आहेत. त्यामुळे जर तिथे काही पेचप्रसंग उद्भवला, तर मी तो गुंता सोडवेन, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं.
वर्ल्ड कपचं वेळापत्रक बदलणं इतकं सोपं नाही. वेळापत्रक बदलणं बीसीसीआयच्या हातात नाही. त्यासाठी इतर संघांनाही मर्जीत घ्यावं लागतं. त्यामुळे वेळापत्रकात बदल करणं अवघड असतं.
नियोजित वेळापत्रकानुसार, 9 आणि 10 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये समाने होणार आहेत. या 2 सामन्यांपैकी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या मॅचचाही समावेश आहे. हैदराबाद पोलिसांनी या दोन्ही सामन्यांना सुरक्षा पूरवण्यात असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयने श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्यात बदल करण्याआधी एचसीएला विश्वात घेतलं नाही, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली.