दक्षिण अफ्रिकेने टी20 संघाच्या कर्णधारपदाची माळ हेनरिक क्लासेनच्या गळ्यात घातली, कारण…
दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात 10 डिसेंबरपासून टी20 मालिका होणार आहे. या मालिकेत तीन सामने असणार आहेत. पण या मालिकेपूर्वी दक्षिण अफ्रिका संघात उलथापालथ झाली असून हेनरिक क्लासेनला कर्णधारपद सोपवलं आहे.
1 / 5
पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत दक्षिण अफ्रिकेचा संघ जाहीर झाला आहे. या संघाचं नेतृत्व हेनरिक क्लासेन करणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं याची कुजबूज सुरु आहे. पण वैयक्तिक कारणामुळे मार्करम या मालिकेत खेळणार नाही.
2 / 5
एडन मार्करमच्या गैरहजेरीत दक्षिण अफ्रिका टी20 संघाचं नेतृत्व हंगामी कर्णधार म्हणून क्लासेन करणार आहे. दुसरीकडे, कसोटी संघातील मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि ट्रिस्टन स्टब्सही या मालिकेत खेळणार नाहीत.
3 / 5
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील टी20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना डर्बन येथे, दुसरा सामना 13 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे होणार आहे. तसेच तिसरा सामना 14 डिसेंबरला जोहान्सबर्ग येथे होणार आहे.
4 / 5
दक्षिण आफ्रिका टी20 संघ: हेनरिक क्लासेन (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झक, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, जॉर्ज लिंडे, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, हेन्रिक नोकिया, न्काबा पीटर, रायन सिमने, टॅब्रेझिले, टॅबरेसी, रॅनिक आणि रस्सी वन डर दुसेन.
5 / 5
पाकिस्तान टी20 संघ: मोहम्मद रिझवान (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, जहंदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, सैम अयुब, सलमान अली आगा, सुफियान मुकीम, शाहीन आफ्रिदी, तय्यब ताहिर आणि उस्मान खान (विकेटकीपर).