IPL 2024 : आयपीएल इतिहासातील हे आहेत टॉप 5 वेगाने चेंडू टाकणारे गोलंदाज, जाणून घ्या त्यांच्याबाबत
आयपीएल 2024 स्पर्धा सुरु असून रोज नवे विक्रम रचले आणि मोडले जाताना दिसत आहेत. असं सर्व असताना लखनौ सुपर जायंट्सच्या वेगवान गोलंदाज मयंक यादवने लक्ष वेधून घेतलं आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात टाकलेल्या वेगवान चेंडूमुळे त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात आयपीएलमध्ये आतापर्यंत वेगाने चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांबाबत
1 / 6
आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व सुरु असून एक एक सामन्याच्या माध्यमातून स्पर्धा पुढे सरकत आहे. या स्पर्धेत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. तसेच काही विक्रम मोडण्याच्या वेशीवर आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स सामन्यात मयंक अग्रवालने वेगाने टाकलेल्या चेंडूची चर्चा रंगली आहे. चला आतापर्यंत सर्वात वेगाने कोणी चेंडू टाकलेत ते जाणून घेऊयात
2 / 6
आयपीएल इतिहासात सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेट याच्या नावावर आहे. 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना टेटने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 157.71 किमी प्रतितासाने चेंडू टाकला होता.
3 / 6
गुजरात टायटन्सचा लॉकी फर्ग्युसन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 157.3 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.
4 / 6
आयपीएलमध्ये सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम भारतीय गोलंदाज उमरान मलिकच्या नावावर आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या उमरान मलिकने 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.
5 / 6
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा एनरिक नोकिया या यादीत चौथ्या स्थानावर आहे. आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 156.2 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.
6 / 6
लखनौ सुपर जायंट्सच्या मयंक यादवने पदार्पणाच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मयंकने पहिल्याच षटकात आपल्या वेगानं खळबळ उडवून दिली. आपल्या कारकिर्दीतील पहिला चेंडू 147.1kph च्या वेगाने टाकला. त्यानंतर 4 षटकांच्या स्पेलमध्ये 150 किमी प्रतितास पेक्षा अधिक वेगाने 9 चेंडू टाकले.पंजाब किंग्ज विरुद्ध मयंक यादवने 155.8 किमी प्रतितास इतक्या वेगाने चेंडू टाकला.