बॉर्डर गावस्कर कसोटी सामन्यापूर्वी ट्रेव्हिस हेडने टीम इंडियाला डिवचलं, बोलून गेला असं काही
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडने दोन वेळेस भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचं तोंड दाखवलं होतं. त्यामुळे ट्रेव्हिस हेडची धास्ती भारतीय चाहत्यांनी घेतली आहे. असं असताना ट्रेव्हिस हेडने भारतीय संघाला डिवचणारं विधान केलं आहे.
1 / 6
ट्रेव्हिस हेड सध्या इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करत आहे. स्कॉटलंडविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या हेडने पहिल्या टी20 मध्ये चांगली कामगिरी करत विजय मिळवून दिला. पण, दुसऱ्या टी20 मध्ये तो अपयशी ठरला आणि संघाचाही पराभव झाला. यासह तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे.
2 / 6
ट्रेव्हिस हेड आणि भारतीय चाहते यांचं एकमेकांशी वाकडं असणार हे खरं आहे. कारण ट्रेव्हिस हेडने एकदा नाही तर दोनदा भारतीय चाहत्यांच्या स्वप्नांवर पाणी टाकलं होतं. त्यामुळे ट्रेव्हिस हेडला भारताविरुद्ध खेळायला आवडत असावं, असं चर्चा होती. पण ट्रेव्हिस हेडने टीम इंडिया आपला आवडता प्रतिस्पर्धी संघ नसल्याचे विधान केले आहे.
3 / 6
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेबद्दल स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हेड म्हणाला, 'मला नाही वाटत की टीम इंडिया माझा आवडता संघ आहे. टीम इंडियाविरुद्ध आणखी सामने खेळणार आहे. याशिवाय, गेल्या काही वर्षांपासून मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे हो, स्पर्धेसाठी चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे.तयार होणे कठीण नाही, त्यामुळे ते खूप कठीण आहेत असे मी म्हणणार नाही, परंतु यावेळी चांगले खेळणे महत्त्वाचे आहे."
4 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी हेडची संघात निवड होईल, अशी मीडियात चर्चा आहे. तर स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल असं सांगण्यात येत आहे.
5 / 6
2023 मधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात हेडने भारताविरुद्ध 163 धावांची शानदार खेळी खेळली. याशिवाय एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने 137 धावा केल्या होत्या. या दोन्ही फायनलमध्ये हेडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
6 / 6
ट्रेव्हिस हेडने 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरुद्ध 43 चेंडूत 76 धावांची तुफानी खेळी केली होती. हेड क्रीझमध्ये असेपर्यंत टीम इंडियाचा पराभव निश्चित आहे, असंच वाटत होतं. पण, हेडचा खेळ 76 धावांवर संपुष्टात आणि भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.