IBSA Games: भारतीय क्रिकेट संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत जिंकलं गोल्ड
वर्ल्ड ब्लाइंड गेम्समध्ये पहिल्यांदाच टी20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. भारताचा महिला आणि पुरुष संघ दोन्हीही अंतिम फेरीत पोहोचले आहेत. महिला संघाने सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे. तर भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
1 / 6
भारताच्या ब्लाइंट क्रिकेट संघाने वर्ल्ड ब्लाइंड गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे. इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये आयोजित केलेल्या गेम्समध्ये पहिल्यांदाच टी20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
2 / 6
भारताच्या महिला क्रिकेट संघान ऑस्ट्रेलियाला 9 गडी राखून हरवून सुवर्ण पदक पटकावलं. यासह टी20 क्रिकेटमधील पहिला चॅम्पियन संघ बनला आहे.
3 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अंतिम फेरीचा सामना रंगला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखलं.
4 / 6
टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 8 गडी बाद करत 114 धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाकडून वेबेकने सर्वाधिक 30 धावा केल्या.
5 / 6
भारताचा डाव सुरु असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भारतासमोर 9 षटकात 44 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. टीम इंडियाने 3.3 षटकात 1 गडी गमवून 43 धावा केल्या आणि जेतेपदावर नाव कोरलं.
6 / 6
भारतीय क्रिकेट संघ : Varsha U (c), V Ravani, S Das, P Tudu, G Neelappa, B Hansda, S Davis, Deepika TC, P Saren, S Patel, M Satyavathi (wk) (सर्व फोटो- ट्विटर)