ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा कसोटी सामना सुरु असताना दुसरीकडे वेगळीच लढाई पाहायला मिळत आहे. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पहिलं स्थान मिळवण्यासाठी दोन खेळाडूंमध्ये चुरशीची लढाई आहे. (Photo- BCCI)
अहमदाबादमध्ये चौथा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये फिरकीपटू आर. अश्विन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन संयुक्तिकपणे एक नंबरवर आहेत. (Photo- BCCI)
मागच्या रँकिंगमध्ये अश्विन पहिल्या स्थानावर होता. पण इंदुर कसोटीत 4 गडी बाद केल्याने 6 अंकांचं नुकसान झालं आहे. अश्विन आणि अँडरसन 859 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. (Photo- BCCI)
चौथ्या कसोटीत अँडरसनला मागे टाकण्याची नामी संधी अश्विनकडे आहे. चौथ्या कसोटीत विजयासह नंबर वनचं स्थान मिळवण्याकडे लक्ष असेल. (Photo- BCCI)
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा देखील या शर्यतीत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत आठ विकेट घेत तिसरं स्थान मिळवलं आहे. त्याचे आयसीसी क्रमवारीत 807 गुण आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स 849 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. (Photo- AFP)