चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक असताना बीसीसीआयने सुधारित भारतीय संघ जाहीर केला आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. पण तो या स्पर्धेसाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे आधी जाहीर केलेल्या संघात बदल करण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराहच्या जागी संघात हार्षित राणाला संधी दिली गेली आहे. तर डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालला वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली आहे. तसेच तीन राखीव खेळाडूंची निवड केली आहे.
मोहम्मद सिराजचं नाव राखीव खेळाडूंच्या यादीत आहे. गेल्या काही वर्षांपासून मोहम्मद सिराज टीम इंडियाचा भाग आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीतून त्याला वगळण्यात आलं आहे. सुधारित संघात त्याचं नाव राखीव यादीत ठेवण्यात आलं आहे.
मोहम्मद सिराजसह यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचंही राखीव यादीत नाव आहे. तिन्ही खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघासोबत प्रवास करणार नाहीत. ते भारतातच असणार आहेत.
टीम इंडियाच्या 15 सदस्यांपैकी कोणीही दुखापतग्रस्त झाला तर ते बदली खेळाडू म्हणून दुबईला जातील. त्यामुळे स्पर्धा संपेपर्यंत या खेळाडूंना तयार राहावं लागणार आहे.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. | राखीव खेळाडू:- मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे.