Icc Champions Trophy 2025 : सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारे संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील एकूण 8 संघ भिडणार आहेत. या 8 संघांपैकी कोणत्या टीमने सर्वाधिक वनडे मॅचेस खेळल्या आहेत? आकडेवारीतून जाणून घ्या.
1 / 9
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. ही स्पर्धा वनडे फॉर्मेटनुसार होणार आहे. या निमित्ताने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 संघांनी आतापर्यंत किती एकदिवसीय सामने खेळले आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Muhammad Sameer Ali/Getty Images)
2 / 9
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानने आतापर्यंत 979 एकदिवसीय सामने खेळले आहेत. (Photo Credit : Pakistan Cricket X Account)
3 / 9
टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपनंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मानस असणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 1 हजार 58 वनडे मॅचेस खेळल्या आहेत. सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. (Photo Credit : Jasprit Bumrah X Account)
4 / 9
ऑस्ट्रेलियाने तब्बल 2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. कांगारुंनी आतापर्यंत एकूण 1 हजार 8 सामने खेळले आहेत. (Photo Credit : Pat Cummins X Account)
5 / 9
अफगाणिस्तान या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळणार आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत एकूण 175 एकदिवसीय सामने खेळले आहेत. (Photo Credit : afghanistan cricket team X Account)
6 / 9
इंग्लंडने 805 एकदिवसीय सामने खेळले आहेत.टीम इंडियाने इंग्लंडला 23 जून 2013 रोजी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. इंग्लंड या स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारी पहिली टीम ठरली आहे. (Photo Credit : england cricket X Account)
7 / 9
टी 20i वर्ल्ड कप उपविजेता दक्षिण आफ्रिका संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने 681 सामने खेळले आहेत. (Photo Credit : ProteasMenCSA X Account)
8 / 9
न्यूझीलंडचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या स्पर्धेतून पत्ता कट झाला आहे. त्यामुळे किवी चॅम्पियनशीप ट्रॉफीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. न्यूझीलंडने 828 सामने खेळले आहेत. (Photo Credit : Blackcaps X Account)
9 / 9
शेजारी बांगलादेशने आतापर्यंत अनेक संघांना पराभवाची धुळ चारली आहे. बांगलादेश या स्पर्धेत आता कुणाला पराभवाचा झटका देते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. बांगलादेशने 444 एकदिवसीय सामने खेळले आहेत. (Photo Credit :Bcci)