ओमानच्या अयान खान 3 जुलैला नेदरलँड विरुद्ध 92 बॉलमध्ये 105 धावांची शतकी खेळी केली. अयानने झिंबाब्वेत सुरु असलेल्या वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत ही कामगिरी केलीय.
अयान खान याच्या वनडे कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. मात्र यानंतरही ओमानचा 74 धावांनी पराभव झाला.
अयानने याआधी मध्य प्रदेश क्रिकेट संघांचं प्रतिनिधित्व केलंय. आता ओमानसाठी खेळत असलेला अयान हा जन्माने भारतीय आहे. अयानचा जन्म 1992 साली भोपाळ इथे झाला होता. अयान मध्य प्रदेशसाठी सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत एक मॅचमध्ये खेळलाय. या संघात तेव्हा आताच टीम इंडियाचा वेंकटेश अय्यर हा देखील होता.
मीडिया रिपोर्टनुसार, अयानला मध्य प्रदेशटीमकडून फारशी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अयान 2018 साली ओमानला रवाना झाला. अयान 3 वर्षांच्या कुलिंग पीरियडनंतर ओमाना इंटरनॅशनल क्रिकेट टीमसाठी पात्र ठरला. त्यानंतर अयानने 2021 मध्ये ओमानसाठी पदार्पण केलं.
अयानचं हॉकी कनेक्शनही आहे. अयान आणि भारताचे दिग्गज हॉकीपटू आणि ऑल्मिपिक स्टार अस्लम शेर खान हे नातेवाईक आहे. अस्लमचे वडील अहमद शेर खान यांनी 1936 ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं.