Icc On Pakistan | आयसीसी पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत
आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरुन आधीच वाद पेटलाय. बीसीसीआयने पाकिस्तान जाण्यास नकार दिलाय. त्यानंतर आता आयसीसी पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.
1 / 5
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपच्या आयोजनावरुन आधीच वाद रंगला आहेत. त्यात आता पीसीबीवर आणखी एक संकट येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार 2025 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानमध्ये काढून घेतलं जाऊ शकतं. (PC-AFP)
2 / 5
आशिया कप आयोजनाच्या वादावरुन हा निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आयसीसी या वादानंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन हे वेस्टइंडिज किंवा अमेरिकेत करु शकते. (PC-AFP)
3 / 5
यजमानपद गमावल्याने जे नुकसान होईल त्याची भरपाई आयसीसी पाकिस्तानला देईल. आयसीसीने नुकसान भरपाई दिली तरी पाकिस्तानची फजिती होणं निश्चित आहे. (PC-AFP)
4 / 5
तसंच फक्त चॅम्पियन ट्रॉफी 2025 सह टी 20 वर्ल्ड कप 2024 स्थळ ही बदलण्यात येऊ शकतं. टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन हे वेस्टइंडिज-अमेरिकामध्ये होणार आहे. मात्र या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे स्कॉटलंड किंवा आयर्लंडमध्ये होऊ शकतं. (PC-AFP)
5 / 5
दरम्यान सध्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आशिया कपकडे आहे. पाकिस्तानचं आशिया कप यजमानपद जाणं जवळपास निश्चित आहे. बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी तयार नाही. तसेच आशिआई क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या हायब्रिड मॉडलला नकार दिलाय. (PC-AFP)