भारताला 2011 नंतर पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. आयसीसीने मंगळवारी 27 जून रोजी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी सामना खेळवण्यात येणार आहे.
रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडियाच्या विजयात पाकिस्तानचे 3 खेळाडू आहेत, जे डोकेदुखी आहेत. या तिघांना रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी याच्या भेदक माऱ्याचा जपून सामना करण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. शाहीनने आतापर्यंत 36 वनडेंमध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.
मोहम्मद रिझवान हा विकेटकीप बॅट्समन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरु शकतो. रिझवानने आतापर्यंत 57 वनडे सामन्यांमधअये 2 शतकं आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 408 धावा केल्या आहेत. रिझवान आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध खेळलेला नाही. त्यामुळे रिझवानची कसोटी लागणार आहे. अशात भारतीय गोलंदाजांनाही रिझवान विरुद्ध रणनिती आखावी लागेल.
बाबर आझम याच्यावर खांद्यावर कॅप्टन आणि बॅट्समन अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे बाबरवर टीम इंडिया विरुद्ध दमदार कामिगरीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या या तिकडीने रोखण्याचं आव्हान असणार आहे.