ICC WC Qualifier 2023 : झिम्बाब्वेने वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास, भारताला झटका लागता लागता राहीला
आयसीसी वनडे विश्वचषक पात्रता स्पर्धा 2023 स्पर्धेत झिम्बाब्वेने चमकदार कामगिरी केली आहे. वनडे इतिहासात झिम्बाब्वेने पहिल्यांदाच इतक्या धावांचा डोंगर रचला आहे. युनाईटेड स्टेट्सचा 304 धावांनी पराभव केला आहे.
1 / 6
आयसीसी वनडे विश्वचषक पात्रता फेरीत झिम्बाब्वे विरुद्ध युनाईटेड स्टेट यांच्यात सामना रंगला. या सामन्यात युनाईटेड स्टेटने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या अंगाशी आला असंच म्हणावं लागेल. झिम्बाब्वेनं जबरदस्त फलंदाजी करत धावांचा डोंगर रचला. झिम्बाब्वेनं 50 षटकात 6 गडी गमवून 408 धावा केल्या.
2 / 6
कर्णधार सीन विलियम्सने दुसऱ्या गड्यासाठी जॉयलॉर्ड गुम्बीसोबत 160 भागीदारी केली. सीनने 65 चेंडूत शतक झळकावलं.
3 / 6
कर्णधार सीन विलियम्सने 101 चेंडूत 174 धावांची खेळी केली. यात 21 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे.
4 / 6
शेवटच्या काही षटकांमध्ये सिकंदर रझाने 27 चेंडूत 48 धावा केल्या, तर रायन बर्लने 16 चेंडूत 4 उत्तुंग षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. त्यामुळे झिम्बाब्वेला 400 धावांचा टप्पा ओलांडता आला. 50 षटकांत झिम्बाब्वेने 6 गडी गमावून 408 धावा केल्या.
5 / 6
एकदिवसीय क्रिकेटमधील झिम्बाब्वेची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने 2009 मध्ये केनियाविरुद्ध 351 धावा केल्या होत्या. आता त्यांनी अमेरिकेविरुद्ध 408 धावा करून नवा इतिहास रचला आहे.
6 / 6
वनडे इतिहासात सर्वाधिक मार्जिनने हरवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध 50 षटकात 391 धावा केल्या होत्या आणि श्रीलंकेचा संघ 74 धावांवर बाद झाला होता. भारताने हा सामना 317 धावांनी जिंकला होता. आता झिम्बाब्वेने 409 धावा केल्या आणि युनाइटेड स्टेटला 104 धावांवर रोखलं. झिम्बाब्वेने हा सामना 304 धावांनी जिंकला.