IND vs PAK : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान 6 ऑक्टोबरला महामुकाबला, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

| Updated on: May 05, 2024 | 8:38 PM

Womens T20 World Cup 2024 Schedule : आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालंय. या स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून बांगलादेशमध्ये सुरुवात होणार आहे.

1 / 6
आयसीसीने वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचं यजमानपद बांगलादेशकडे आहे.

2 / 6
या स्पर्धेत एकूण 10 संघ असून 23 सामने होणार आहेत. तर 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान सामने पार पडणार आहेत. एकूण 10 संघांना 2 गटात विभागण्यात आलंय. ए ग्रुपमधील टीमचे सर्व सामने सिल्हेटमध्ये तर बी ग्रुपमधील टीमचे सामने राजधानी ढाक्यात होतील.

3 / 6
स्पर्धेतील सलामीचा सामना हा 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना हा 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.

4 / 6
क्रिकेट चाहत्यांना कायम टीम इंडिया-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची प्रतिक्षा असते. हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी  6 ऑक्टोबरला भिडणार आहेत.

5 / 6
टीम इंडियाने गेल्या वर्षी 2023 च्या वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला होता. टीम इंडियाने पाकिस्तानवर 19 व्या ओव्हरमध्ये 7 विकेट्सने सामना जिंकला होता.

6 / 6
दरम्यान ऑस्ट्रेलिया ही सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलिया संघ गतविजेता आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने एकूण 6 वेळा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे.