Icc World Cup स्पर्धेतील 5 वर्ल्ड रेकॉर्ड, जे ब्रेक होणं अशक्य
Icc World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होतेय. या वर्ल्ड कपमध्ये 5 असे वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत, जे ब्रेक होणं जवळपास अशक्य आहेत.
1 / 6
भारताकडे वर्ल्ड कप 2023 चं यजमानपद आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत खेळणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे यंदाही ब्रेक होऊ शकत नाहीत.
2 / 6
एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 2003 च्या वर्ल्ड कपमधील 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या.
3 / 6
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्डही अबाधित राहणार आहे. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेम मॅकग्रा याच्या नावावर आहे. मॅकग्रा याने 71 विकेट्स घेतल्या आहेत.
4 / 6
आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा रिकी पॉन्टिंग याच्या नावावर आहे. पॉन्टिंगने एकूण 46 सामने खेळले आहेत. त्यामुळे हा विक्रम इतक्यात मोडेल हे शक्य नाही.
5 / 6
आता हा असा रेकॉर्ड आहे जो कुणीच ब्रेक करण्याच्या फंद्यात पडणार नाही. सुनील गावसकर यांनी 1975 साली सर्वात संथ खेळी केली होती. गावसकर यांनी इंग्लंड विरुद्ध 174 बॉलमध्ये 36 धावा केल्या होत्या.
6 / 6
मिस्टर युनिव्हर्स अर्थात विंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल याच्या नावावर सर्वाधिक सिक्सचा विक्रम आहे. गेलने वर्ल्ड कपमध्ये 49 सिक्स ठोकले आहेत. गेलचा रेकॉर्ड कुणी ब्रेक करेल, असा दावेदार सध्या तरी नाही.