भारतात यंदा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, या स्पर्धेचं आयोजन 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलंय. आता सामन्यांच्या वेन्यूबाबत अर्थात ठिकाणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
विवाहित महिलेला एक मुलगीही होती मात्र तिचं वैवाहिक आयुष्य काही ठिक नव्हतं. त्यामुळे तिचा प्रेमावरून विश्वासच उडाला होता.
तर वर्ल्ड कप फायनल महाअंतिम सामना हा जगातील सर्वात मोठं असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
तर दैनिक जागरण वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, भारतातील एकूण 12 शहरांमध्ये वर्ल्ड कप सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. या 12 शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, धर्मशाळा, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, पुणे आणि तिरुवनंतपूरममध्ये सामन्याचं आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान आयसीसीकडून सामन्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. आयसीसी 27 जून रोजी वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.