बीसीसीआय वार्षिक करारासाठी खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशा एकूण 4 श्रेणीत विभागते. खेळाडूंना वार्षिक कराराअंतर्गत श्रेणीनुसार वेतन मिळतो.
बीसीसीआयकडून ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळतात. तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून ए प्लस खेळाडूंना वार्षिक 48 लाख रुपये मिळतात.
टीम इंडियाच्या ए श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी मिळतात. तर बांगलादेशच्या ए कॅटेगरीतील क्रिकेटपटूंना वार्षिक 36 लाख रुपये मानधन मिळतं.
टीम इंडियाच्या बी श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये मिळतात. तर बांगलादेशच्या खेळाडूंना 24 लाख रुपये मिळतात.
टीम इंडियाच्या सी श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये दिले जातात. तर बांगलादेशच्या सी श्रेणीतील खेळाडूंना फक्त 12 लाख रुपये मिळतात. थोडक्यात टीम इंडियाच्या सी कॅटेगरीतील एका खेळाडूला वर्षासाठी मिळणाऱ्या वेतनात बांगलागदेशचे 12 खेळाडू बसतात.
तसेच टीम इंडिया आणि बांगलादेशच्या खेळाडूंना टी 20, वनडे आणि टेस्ट फॉर्मेटमधील प्रत्येक मॅचसाठी मिळणारं मानधन यातही फार अंतर आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना कसोटीसाठी 15, वनडेसाठी 6 आणि टी 20 साठी 3 लाख रुपये मिळतात. तर बांगलादेशच्या खेळाडूंना कसोटीसाठी 3, वनडेसाठी 2 आणि टी 20 साठी 1 लाख रुपये दिले जातात.