World Cup 2023 | टीम इंडियाच्या टॉप 11 खेळाडूंचे वर्ल्ड कपमधील आकडे, कोण भारी?
Icc World Cup 2023 Team India | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साखळी फेरीत शंभर नंबरी कामगिरी केली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या खेळाडूंनी अफलातून कामगिरी करत विजयात मोठी भूमिका पार पाडली.
1 / 12
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील साखळी फेरी पार पडली. टीम इंडियाने सलग 9 सामने जिंकले. टीम इंडियाच्या विजयात योगदान देणाऱ्या टॉप 11 खेळाडूंची कामगिरी आपण जाणून घेणार आहोत.
2 / 12
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगने धमाका केला. रोहितने 9 सामन्यात 503 धावा केल्या. तसेच 1 विकेटही घेतली.
3 / 12
ओपनर शुबमन गिल याने 270 धावा केल्या. शुबमनला डेंग्युमुळे पहिल्या 2 सामन्यात खेळता आलं नाही.
4 / 12
विराट कोहली याने 9 सामन्यात टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली. विराटने 594 धावा आणि 1 विकेट घेतली.
5 / 12
मुंबईकर श्रेयस अय्यर याला सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करावा लागला. मात्र श्रेयसला त्यानंतर सूर गवसला. श्रेयसने 421 रन्स केल्या.
6 / 12
विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याने 347 धावा केल्या. तसेच विकेटमागून निर्णायक भूमिका बजावली.
7 / 12
सूर्यकुमार यादव याला वर्ल्ड कपमध्ये फारशी संधी मिळाली नाही. मात्र तरीही सूर्याने 87 रन्स केल्या.
8 / 12
रवींद्र जडेजा याने टीम इंडियासाठी अष्टपैलू कामगिरी केली. जडेजाने 16 विकेट्स आणि 111 धावा केल्या.
9 / 12
मोहम्मद शमी याला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. मात्र शमीने मागून येऊन 16 विकेट्स घेतल्या.
10 / 12
यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहने यानेही आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर धमाका केला. बुमराहने 17 विकेट्स घेतल्या.
11 / 12
चायनामॅन बॉलर कुलदीप यादव याने आपल्या फिरकीच्या जोरावर भल्या भल्यांना गुंडाळलं. कुलदीपने 14 विकेट्स मिळवल्या.
12 / 12
'मॅजिक मिया' मोहम्मद सिराज याने 12 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आयसीसी वनडे बॉलिंग रँकिगमध्ये नंबर 1 ठरला.