Icc World Cup 2023 मध्य सर्वाधिक सिक्स ठोकणारे फलंदाज
Most Sixes In World Cup 2023 League Stage | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीत 10 संघांच्या फलंदाजांनी जोरदार धमाका केला. त्यापैकी 5 फलंदाजांनी सिक्स ठोकण्याचा कारमाना केलाय. पाहा कोण आहेत ते?
1 / 6
13 व्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने पूर्ण झालेत. या साखळी फेरीत सर्वाधिक सिक्स कुणी ठोकलेत हे जाणून घेऊयात.
2 / 6
वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीत टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने धमाका केलाय. रोहितने साखळी फेरीत सर्वाधिक 24 षटकार खेचले आहेत.
3 / 6
दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल आहे. ग्लेनने 22 सिक्स खेचले. ग्लेनने अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 201 धावांची द्विशतकी खेळी केली होती.
4 / 6
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक यानेही आपल्या अखेरच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाका केलाय. क्विंटनने साखळी फेरीत 21 सिक्स ठोकले.
5 / 6
ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर याचाही हा अखेरचा वर्ल्ड कप आहे. वॉर्नरने साखळी फेरीत 20 सिक्स ठोकले.
6 / 6
ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मिचेल मार्श यानेही टीमसाठी तडाखेदार फलंदाजी केली. मिचेलने साखळी फेरीत 20 षटकार ठोकले.