Asia Cup 2023: आशिया कप झाला नाही तर पाकिस्तानला बसणार 4 मोठे धक्के, कसं ते समजून घ्या

| Updated on: Jun 06, 2023 | 10:57 PM

पाकिस्तानला आशिया कप 2023 यजमानपद सोपण्यात आलं होतं. मात्र भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर इतर तीन देशांनी पाकिस्तान बाहेर स्पर्धा आयोजित करण्यास सांगितली आहे.

1 / 5
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मंगळवारी जोरदार धक्का बसला आहे. आशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या हायब्रिड मॉडेलला श्रीलंगा, बांगलादेश आणि अफगाणिस्तानने नकार दिला आहे. पण ही स्पर्धा देशाबाहेर झाली तर पाकिस्तान खेळणार नाही असं जाहीरपणे सांगितलं आहे. जर पाकिस्तानने आशिया कपमध्ये भाग घेतला नाही तर काय नुकसान होईल जाणून घेऊयात (Photo : AFP)

2 / 5
पाकिस्तानला पहिला फटका आर्थिक दृष्टीकोनातून बसेल. आशिया कपच्या आयोजनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची कोट्यवधी रुपयांची कमाई होते. त्यामुळे आयोजन न झाल्यास आर्थिक फटका बसेल. (File Pic)

3 / 5
भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप आहे. त्यापूर्वी आशिया कप खेळला जाणार आहे. या स्पर्धेत खेळल्यानंतर पाकिस्तानची टीम वनडे वर्ल्डकपसाठी तयारी करू शकते. हा वर्ल्डकपमध्ये भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानही खेळत आहेत. त्यामुळे आशियाकपमध्ये या संघाविरुद्ध खेळून पाकिस्तानला आपली बाजू सुधारता येईल. (File Pic)

4 / 5
टीम इंडिया आशिया कपसाठी  पाकिस्तानात खेळणार नसेल तर पाकिस्तानी संघही भारतात वनडे वर्ल्डकपसाठी येणार नाही, असं जाहीरपणे सांगितलं आहे. पाकिस्तानने असं केल्यास त्यांचंच नुकसान होईल. आयसीसी पाकिस्तानवर कारवाई करू शकते. (File Pic)

5 / 5
पाकिस्तानला 2025 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजनही करायचं आहे. जर अशीच स्थिती राहिली तर मात्र पाकिस्तानला मोठा फटका बसेल. भारत चॅम्पियन ट्रॉफीसाठीही पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला विचार करावा लागणार आहे. (File Pic)