IPL Auction : केएल राहुलला आयपीएल 2025 लिलावात 3 कोटींचा तोटा! दिल्ली कॅपिटल्सचा असा होणार फायदा

| Updated on: Nov 24, 2024 | 8:20 PM

आयपीएल 2024 स्पर्धा केएल राहुल आणि लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्यातील वादामुळे गाजली. तेव्हापासूनच केएल राहुल फ्रेंचायझीसोबत खेळणार नाही अशी चर्चा रंगली होती. इतकंच काय तर लखनौ सुपर जायंट्सने त्याला रिलीज केलं आणि आरटीएम कार्डही वापरलं नाही.

1 / 6
आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी केएल राहुलची खूपच चर्चा रंगली होती. आयपीएल मेगा लिलावात त्याच्यासाठी आरसीबी मोठी किंमत मोजेल असं वाटलं होतं. पण आरसीबीवर दिल्ली कॅपिटल्सने मात केली आणि त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

2 / 6
दिल्ली कॅपिटल्सला केएल स्वस्तात मिळाला. कारण लखनौ सुपर जायंट्सकडून त्याला मागच्या पर्वात 17 कोटी रुपये मिळाले होते. पण मेगा लिलावात त्याला फक्त 14 कोटी मिळाले आहेत. म्हणजेच 3 कोटींचा फटका बसला आहे.

3 / 6
केएल राहुल आयपीएलमधील यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. 2022 पासून लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. तीन पर्वात त्याने लखनौचं प्रतिनिधित्व केलं. पण संघाला जेतेपद मिळवून देता आलं नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळल्याची चर्चा आहे.

4 / 6
आयपीएलमध्ये 2013 मध्ये पदार्पण करणाऱ्या राहुलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 132 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 4 शतके आणि 37 अर्धशतकांसह 4,683 धावा केल्या आहेत. याशिवाय राहुलने आयपीएलच्या सहा पर्वात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. गेल्या पर्वातही त्याने 520 धावा केल्या होत्या.

5 / 6
लखनौ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका आणि राहुल यांच्यात मैदानावर भांडण झाले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलच्या संघाचा 10 विकेट्सनी पराभव झाला होता. यानंतर संघाच्या डगआऊटजवळ मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार केएल राहुलला जाहीरपणे सुनावलं होतं.

6 / 6
लिलावात केएल राहुलला आरसीबी खरेदी करेल, अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा होती. सुरुवातीला राहुलला विकत घेण्यात आरसीबीने रस दाखवला पण त्यानंतर माघार घेतली. त्यामुळे राहुल कमी किंमतीत दिल्ली संघात सामील झाला. केएल राहुलच्या रुपाने दिल्ली कॅपिटल्सला कर्णधार मिळाला आहे. ऋषभ पंतनंतर दिल्लीचं नेतृत्व केएल राहुलच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे.