KBC : ‘कौन बनेगा करोडपति’मध्ये 25 लाख रुपयांसाठी विचारला क्रिकेटबाबत असा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहिती आहे का?

| Updated on: Aug 25, 2023 | 4:50 PM

कौन बनेगा करोडपति हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. गुरुवारी एका स्पर्धकाला अमिताभ बच्चन यांनी क्रिकेटशी निगडीत प्रश्न विचारला. हा प्रश्न 25 लाखांसाठी होता. नुकतीच पार पडलेल्या भारत-वेस्टइंडिज मालिकेबाबत हा प्रश्न होता. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतं का ते पाहा

1 / 5
कौन बनेगा करोडपति या कार्यक्रमात क्रिकेटशी निगडीत अनेक प्रश्न विचारले जातात. गुरुवारी असाच एक प्रश्न अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला विचारला. हा प्रश्न वडील आणि मुलाच्या विकेटबाबत होता. (फोटो-ट्विटर)

2 / 5
अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला विचारलं की, भारतीय क्रिकेटर ज्याने वडील आणि मुलाची विकेट घेतली आहे? हा प्रश्न 25 लाख रुपयांसाठी विचारण्यात आला होता. (फोटो-एएफपी)

3 / 5
भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत हा विक्रम आर. अश्विनने आपल्या नावावर केला होता. आर. अश्विन याने शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल याची विकेट घेतली आहे. (फोटो-एएफपी)

4 / 5
आर. अश्विन याने 2011 मध्ये शिवनारायण चंद्रपॉल याची विकेट घेतली होती. त्यानंतर 12 वर्षांनी अश्विनने तेजनारायण याला बाद करत विक्रम नोंदवला. (फोटो-एएफपी)

5 / 5
अश्विन पिता-पुत्राला बाद करणारा पहिला भारतीय आणि जगातील पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी वसीम अक्रम, मिचेश स्टार्क, साइम हार्मर आणि इयान बॉथम यांनी ही कामगिरी केली आहे. (फोटो-एएफपी)