मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलं नकोसं शतक, टीम इंडियाला बसला फटका
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 474 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजीची कमकुवत बाजू अधोरेखित झाली. मोहम्मद सिराजची गोलंदाजी टीम इंडियाला खूपच महागात पडली.
1 / 5
मेलबर्न कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकलेला आहे. ऑस्ट्रेलियाने 474 धावा केल्यानंतर भारताचा निम्मा संघ 150 धावांवरच तंबूत परतला आहे. भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली आहे. मोहम्मद शर्माची नकोशा शतकी खेळीने टीम इंडिया अडचणीत आली आहे.
2 / 5
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी गोलंदाजांना भरपूर मेहनत घ्यावी लागली. जसप्रीत बुमराहने त्याचं काम चोख बजावलं. बुमराहने चार, रवींद्र जडेजाने तीन, आकाश दीपने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केला.
3 / 5
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 23 षटके टाकणाऱ्या सिराजला एकही बळी घेता आला नाही. तसेच सिराजने 100 हून अधिक धावा देण्याचा लाजिरवाणा विक्रमही केला आहे.ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने विकेट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
4 / 5
मोहम्मद सिराजने 23 षटके टाकली आणि 5.30 च्या इकॉनॉमीमध्ये 122 धावा दिल्या. यासह तो मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एकही विकेट न घेता सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला. सिराजच्या आधी इशांत शर्माने 2014 कसोटीत एकही विकेट न घेता 104 धावा दिल्या होत्या.
5 / 5
इशांत शर्माने 2014 मध्ये झालेल्या वेलिंग्टन कसोटीत एकही विकेट न घेता 164 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रविचंद्रन अश्विनने 2012 च्या सिडनी कसोटीत एकही विकेट न घेता 157 धावा दिल्या.