आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहचा वाजला डंका, 2024 वर्षात केली अशी कामगिरी
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची मजबूत पकड आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 4 गडी बाद 158 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 357 धावांची आघाडी आहे. असं असताना जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
1 / 5
भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने 4 गडी बाद 158 धावा केल्या आहेत. भारताकडे 357 धावांची आघाडी असून भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.
2 / 5
बांगलादेशने 515 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. झाकीर हसन आणि शदमन इस्लामने सावध खेळी करत 62 धावांची भागीदारी केली होती. ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडत पहिलं यश मिळवून दिलं.
3 / 5
झाकीर हसन 33 धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याची विकेट काढली. या विकेटसह बुमराहने 2024 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
4 / 5
जसप्रीत बुमराहने 14 सामन्यात 47 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने या वर्षात 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 15 विकेट, कसोटी क्रिकेटच्या सहा सामन्यात 32 विकेट घेतल्या आहेत.
5 / 5
जसप्रीत बुमराह 47 विकेटसह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर हाँगकाँगचा अहसान खान असून त्याने 27 सामन्यात 46 विकेट घेतल्या आहेत. तर श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाने 20 सामन्यात 43 गडी बाद केले आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)