टीम इंडिया ए ने एमर्जिंग आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये बांगलादेश ए वर 51 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला 212 धावांचा पाठलाग करताना 160 वर रोखलं.
टीम इंडियाकडून निशांत सिंधू याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. टीम इंडिया याआधी 2013 आणि 2018 ला अंतिम फेरीत पोहचली होती.
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान ए ने पहिल्या सेमी फायनलमध्ये श्रीलंका ए वर 60 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवलं.
त्यामुळे आता या एमर्जिंग आशिया कप अंतिम सामन्यात 23 जुलै रोजी पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए आमनेसामने असणार आहेत.