IND vs AFG | रोहित परतताच टीम इंडियाचं नशिब पालटलं, 46 दिवसांनी मोठं यश
India vs Afghanistan | रोहित शर्माने टीम इंडियात 14 महिन्यांनी कमबॅक केलं. रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाची आयसीसी टी 20 वर्ल्ड कप आधी ही अखेरची टी 20 मालिका आहे.
1 / 5
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिनस्तान टी 20 मालिकेतील पहिला सामना मोहालीत पडणार आहे. या सामन्यातून कॅप्टन रोहित शर्माने 14 महिन्यांनी कमबॅक केलं. रोहितच्या एन्ट्रीनंतर टीम इंडियाचं गूड लकही परत आलंय. टीम इंडियाला 46 दिवसांनी सामन्याआधी मोठं यश मिळालं.
2 / 5
पहिल्या सामन्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी मैदानात आले. टॉस कोण जिंकणार, याकडे सर्वाचं लक्ष होतं. रोहितच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला.
3 / 5
यासह 46 दिवस आणि 11 सामन्यांच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियाने टॉस जिंकला. टीम इंडियाने अखरेचा टॉस हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 26 नोव्हेंबर रोजी जिंकलेला. तेव्हापासून टीम इंडियाने 6 टी 20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यात टॉस गमावला.
4 / 5
टीम इंडियाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन रोहित शर्माने अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं.
5 / 5
रोहितने या सामन्यात यशस्वी दुखापतीमुळे खेळणार नसल्याचं सांगितलं. त्याआधी काही 10 जानेवारी रोजी हेड कोच राहुल द्रविड यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहितसोबत यशस्वी ओपनिंग करणार असल्याचं सांगितलं. मात्र यशस्वी दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी शुबमनने ओपनिंग केली.