IND vs AFG : वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा याने शतक करत केला आणखी एक विक्रम, पाहा आता कोणाकोणाला टाकलं मागे
IND vs AUS : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. मात्र दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने दमदार शतक ठोकत विक्रम नावावर केला आहे.
1 / 7
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने 8 गडी गमवून 272 धावा केल्या आणि विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान गाठताना रोहित शर्मा याने आक्रमक खेळी केली.
2 / 7
रोहित शर्मा याने 63 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. वनडे वर्ल्डकप इतिहासातील रोहित शर्मा याचं हे सातवं शतक आहे. या शतकासह रोहित शर्मा याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतकं करण्याचा मान मिळवला आहे.
3 / 7
कर्णधार रोहित शर्मा याने 2015 ते 2023 या कालवधीत 3 वर्ल्डकपमधील 19 डावात 7 शतकं ठोकली आहेत. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.
4 / 7
सचिन तेंडुलकर याने 1992 ते 2011 या कालावधीतल 6 वनडे वर्ल्डकप कारकिर्दित एकूण 6 शतकं ठोकली आहे. यात सचिन तेंडुलकर 44 डाव खेळला.
5 / 7
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2003 ते 2015 या कालावधीत 4 वर्ल्डकप स्पर्धेत 5 शतकं ठोकली आहेत. यात कुमार संगकारा 37 इनिंग खेळला.
6 / 7
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने 1996 ते 2011 या कालावधीतील 5 वनडे वर्ल्डकपमध्ये 5 शतकं ठोकली आहेत. यात तो 46 इनिंग्स खेळला.
7 / 7
डेविड वॉर्नर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 2015 ते 2023 या कालावधीतील तीन वर्ल्डकपमध्ये 5 शतकं ठोकली आहेत. यात तो 19 इनिंग्स खेळला.