IND vs AFG : सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळीसह नावावर केला विक्रम, केएल राहुलशी केली बरोबरी

| Updated on: Jun 20, 2024 | 10:43 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने जबरदस्त खेळी केली केली. एकीकडे दिग्गज खेळाडू तंबूत असताना डाव सावरला. तसेच अर्धशतकी खेळी करून एका विक्रमाची बरोबरी केली आहे. काय ते जाणून घ्या

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 20 षटकात 8 गडी गमवून 181 धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने जबरदस्त खेळी केली.

2 / 5
सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावलं. सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. 189.29 च्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने टी20 क्रिकेटमध्ये 200 चौकारही पूर्ण केले आहेत.

3 / 5
सूर्यकुमार यादवचा टी20 वर्ल्डकप इतिहासातील पाचवा 50 प्लस स्कोअर आहे. यासह सूर्यकुमार यादवने केएल राहुलशी बरोबरी केली आहे. केएल राहुलने पाचवेळा फिफ्टी प्लस स्कोअर केला आहे.

4 / 5
भारतासाठी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 14 अर्धशतकं झळकावली आहे. त्यानंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने 10 वेळा अशी कामगिरी केली आहे.

5 / 5
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.