IND vs AFG T20: कोहलीचा हा विक्रम रोहित शर्माच्या रडारवर, धोनीची बरोबरी साधण्याची संधी

| Updated on: Jan 10, 2024 | 4:55 PM

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. अनेक विक्रम वेशीवर असून मोठी संधी आहे. टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा मानही मिळू शकतो.

1 / 6
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होत आहे. या मालिकेचं नेतृत्व पुन्हा एकदा रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. 14 महिन्यानंतर या रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे. अफगाणिस्तानविरुद्द रोहित शर्माला काही रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

2 / 6
रोहित शर्माने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 51 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. यात त्याने दोन शतकं आणि 10 अर्धशतकांच्या जोरावर 1527 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने कर्णधार म्हणून 50 सामन्यात 1570 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 44 धावा करताच हा विक्रम रोहितच्या नावावर होईल.

3 / 6
रोहित शर्माने 51 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं असून 39 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. धोनीने 72 सामन्यात नेतृत्व केलं आणि भारताने 42 सामने जिंकले होते. आता अफगाणिस्तानविरुद्धची मालिका 3-0 ने जिंकली तर या विक्रमाची बरोबरी होईल.

4 / 6
रोहित शर्माला टी20 क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करण्याची संधी असेल. रोहितने 148 सामन्यात 139.24 च्या स्ट्राईक रेटने 3853 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने 147 धावा केल्या तर त्याच्या चार हजार धावा पूर्ण होतील.

5 / 6
क्रिकेटच्या तीन फॉरमॅटमध्ये 486 डाव खेळणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत 582 षटकार मारले आहेत. क्रिकेटच्या इतिहासात एकाही फलंदाजाने 600 षटकार मारलेले नाहीत. आता रोहित शर्माला सहाशे षटकार मारण्याची संधी आहे. या मालिकेत रोहित शर्माने 18 षटकार मारताच क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरेल.

6 / 6
रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 29 अर्धशतके झळकावली आहेत. आणखी एक अर्धशतक ठोकल्यास बाबर आझमच्या 30 अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. रोहितने 8 चौकार मारले तर टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू असेल.