IND vs AFG : मोहालीच्या मैदानात टीम इंडियाचाच वरचष्मा, आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात असा रेकॉर्ड
टीम इंडियाने मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत चार टी20 सामने खेळले आहेत. त्यात टीम इंडियाने तीन सामने जिंकले. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळणाऱ्या भारताला 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. 11 जानेवारी रोजी याच मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या टी20 सामना होणार आहे.
1 / 6
यजमान भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका आहे. दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यापूर्वी या दोन्ही कधीच मालिका झाली नव्हती. आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने आले होते.
2 / 6
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. अफगाणिस्तानला टीम इंडियाला आव्हान देणे सोपे जाणार नाही. मोहालीत आतापर्यंत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे.
3 / 6
टीम इंडियाने मोहालीच्या आय एस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत चार टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने तीन सामने जिंकले आहेत. पण 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळणाऱ्या भारताला 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.
4 / 6
भारत अफगाणिस्तान यांच्यात अद्याप एकही टी20 मालिका झालेली नाही. पण आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 5 टी20 सामने झाले. यापैकी टीम इंडियाने 4 सामने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ झाला
5 / 6
rohit sharma-virat kohli
6 / 6
अफगाणिस्तान संघ : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमल, फझुल अहमल, नव हकमल, मोहम्मद सलेम, कैस अहमद, गुलबदिन नायब, राशिद खान.