IND vs AFG | रोहित शर्मा याच्याकडे महेंद्रसिंह धोनीला पछाडण्याची संधी
India vs Afghanistan T20I Series | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला येत्या गुरुवार म्हणजेच 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत कॅप्टन म्हणून रोहित शर्मा याला अनेक विक्रम करण्याची संधी आहे.
1 / 5
टी 20 टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे 14 महिन्यांनी परत आले आहेत. दोघेही अखेरीस टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलमध्ये खेळले होते. त्यानंतर आता ही जोडी जोरदार बॅटिंगसाठी तयार आहे.
2 / 5
रोहित शर्मा याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 39 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर महेंद्र सिंह धोनीने 41 टी 20 सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध कर्णधार म्हणून तिन्ही सामने जिंकून दिले तर तो धोनीला मागे टाकेल. रोहित यासह टीम इंडियाला टी 20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकून देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल.
3 / 5
रोहितला विराट कोहली याचा टीम इंडियाकडून टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. विराटच्या नावावर 1 हजार 570 धावा आहेत. तर रोहित शर्माच्या नावावर 1 हजार 527 धावा आहेत. त्यामुळे विराटला मागे टाकण्यासाठी रोहितला 44 धावांची गरज आहे.
4 / 5
तसेच रोहित या मालिकेतील तिन्ही सामने खेळल्यास 150 टी 20 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरेल. रोहित आतापर्यंत 148 सामने खेळला आहे.
5 / 5
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.