IND vs AFG | टीम इंडिया-अफगाणिस्तान खेळाडूंच्या वेतनात किती फरक?

| Updated on: Jan 15, 2024 | 5:59 PM

Team India And Afghanistan Cricketers Salary | टीम इंडिया आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना किती वेतन मिळतं? दोन्ही संघांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन कुणाला? जाणून घ्या

1 / 5
टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धची 3 सामन्यांची टी 20 मालिका 2-0 ने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा 17 जानेवारी रोजी बंगळुरुत होणार आहे. त्याआधी आपण टीम इंडिया आणि अफगाणिस्तान खेळाडूंच्या वेतनात किती अंतर आहे, हे जाणून घेऊयात.

2 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या पहिल्या फळीतील खेळाडूंना मासिक वेतन म्हणून 58 हजार रुपये दिले जातात. या खेळाडूंचं वार्षिक वेतन हे  6 लाखांच्या घरात आहे.

3 / 5
रिपोट्सनुसार, अफगाणिस्तान टीममधील युवा खेळाडूंना वेतन कमी दिलं जातं. युवा खेळाडूंना मासिक वेतन 32 ते 48 हजार रुपयांदरम्यान मिळतं.  तर वार्षिक पगार 4-5 लाख इतका मिळतो.

4 / 5
तर टीम इंडियाच्या खेळाडूंना श्रेणीनुसार वेतन मिळतं. बीसीसीआय खेळाडूंची कामगिरीनुसार ए पल्स, ए, बी आणि सी अशी वर्गवारी करते. त्यानुसार खेळाडूंचं वेतन ठरतं.

5 / 5
ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. ए श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी रुपये मिळतात. बी गटातील खेळाडूंना 3 आणि सी गटातील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातात. त्या व्यतिरिक्त खेळाडूंना टेस्ट, वनडे आणि टी 20 एका सामन्यासाठी अनुक्रमे 15, 9 आणि 3 लाख रुपये दिले जातात.