IND vs AFG : दुसऱ्या टी20 सामन्यात विराट कोहलीकडे दोन विक्रम मोडण्याची संधी, काय ते जाणून घ्या
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात विराट कोहली खेळणार हे जवळपास निश्चित आहे. शुबमन गिल आणि तिलक वर्माच्या यांना बसवून यशस्वी आणि विराटला संधी मिळेल यात शंका नाही. विराट कोहलीकडे दुसऱ्या टी20 सामन्यात विक्रम करण्याची संधी आहे. काय ते जाणून घ्या
1 / 6
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. कौटुंबिक कारणामुळे विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. आता दुसऱ्या सामन्यात खेळणार यात शंका नाही. 14 महिन्यानंतर विराट कोहली टी20 संघात दिसणार आहे.
2 / 6
दुसऱ्या टी20 सामन्यात विराट कोहली फलंदाजी मैदानात दिसणार आहे. दुसऱ्या टी20 सामन्यासाठी विराट कोहली इंदुरला पोहोचला आहे. या सामन्यात त्याला दोन विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
3 / 6
अफगाणिस्तनविरुद्ध 17 धावा केल्यानंतर एक आणि 25 धावांचा पल्ला गाठल्यावर दुसरा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होणार आहे. विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 4 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण धावांचा पाठलाग करताना 1983 धावा आहेत.
4 / 6
दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची दुसरी फलंदाजी आली तर पहिला विक्रम होईल. धावांचा पाठलाग करण्याची संधी मिळाल्यानंतर 17 धावा केल्या 2000 धावा पूर्ण होतील. पॉल स्टारलिंगनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरेल.
5 / 6
विराट कोहली भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 11965 धावा केल्या आहेत. म्हणजेच यात 25 धावांची भर पडली तर 12000 धावा होतील.
6 / 6
टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 11965, रोहित शर्माने 11035, शिखर धवनने 9645, सुरेश रैनाने 8654, रॉबिन उथप्पाने 7272, एम एस धोनीने 7271 धावा केल्या आहेत.