IND vs AFG : विराट कोहलीने फक्त 24 धावा करत रचला मोठा विक्रम, रोहित शर्माला टाकलं मागे

| Updated on: Jun 20, 2024 | 11:10 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत विराट कोहलीला काही अंशी सूर गवसला असं म्हणायला हरकत नाही. साखळी फेरीत फेल गेल्यानंतर विराट कोहलीने 24 धावा केल्या. या खेळीसह विराट कोहलीने एक विक्रम नावावर केला आहे.

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 24 धावांची खेळी केली. या खेळीसह विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्याने फायदाही झाला आहे.

2 / 5
साखळी फेरीतील तीन सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील धावसंख्येत बरोबरीत होते. दोघांच्या 4042 धावा होत्या. फजलहक फारुकीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला आणि विराट कोहली पुढे निघून गेला.

3 / 5
विराट कोहलीने एका षटकाराच्या मदतीने 24 धावांची खेळी केली. पण राशीद खानच्या गोलंदाजीवर नबीने त्याचा झेल घेतला. यासह विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

4 / 5
पाकिस्तानचा बाबर आझम पुढे आहे. त्याने 116 डावात 4145 धावा केल्या आहेत. त्यानंतर विराट कोहलीची नंबर लागतो. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा, चौथ्या क्रमांकावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आणि पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील आहे.

5 / 5
भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्याय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली अव्वल आहे. त्यानंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल, चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि पाचव्या क्रमांकावर शिखर धवन आहे.