IND vs AUS : पहिल्याच दिवशी बुमराहची रेकॉर्डब्रेक गोलंदाजी, डेल स्टेन-ग्लेन मॅक्ग्रा यांचा विक्रम मोडला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. कर्णधार जसप्रीत बुमराहने 10 षटकात 17 धावा देत 4 गडी बाद केले. यासह बुमराहने काही विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.
1 / 6
भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भारताने पहिल्या डावात सर्व गडी बाद 150 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 67 धावांवर 7 गडी गमावले आहेत. भारतीय संघ अजूनही 83 धावांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा किल्ला उद्ध्वस्त करण्यात जसप्रीत बुमराहची भूमिका महत्त्वाची राहिली.
2 / 6
पहिल्या कसोटी सामन्याचं कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र फलंदाजांनी हवी तशी कामगिरी केली नाही. 150 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. पण या खेळीची जबाबदारी भारतीय गोलंदाजांनी घेतली. खासकरून कर्णधार जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी केली. 10 षटकात 17 धावा देत 4 गडी बाद केले.
3 / 6
जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात आठवी कसोटी खेळत असून आतापर्यंत 35 गडी बाद केले आहेत.
4 / 6
जसप्रीत बुमराहने माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदीचा विक्रम मोडीत काढला आहे. बिशनसिंग बेदीने ऑस्ट्रेलियात 34 गडी बाद केले आहेत. या यादीत कपिल देव 51 विकेटसह आघाडीवर आहे. त्यानंतर अनिल कुंबळे 49 विकेट, तर आर अश्विन 39 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
5 / 6
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम डेल स्टेनच्या नावावर होता. आता या विक्रमाची बरोबरी केली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला गोल्डन डकवर बाद दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी डेल स्टेनने स्टीव्ह स्मिथला गोल्डन डकवर बाद केलं होतं.
6 / 6
जसप्रीत बुमराह गेल्या 24 वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी असलेला गोलंदाज ठरला आहे. 2000 पासून 100 पेक्षा जास्त कसोटी बळी घेतलेल्या गोलंदाजांमध्ये बुमराहची सरासरी 20.3 इतकी आहे. म्हणजेच 20.3 चेंडूवर तो विकेट घेतो. तर ग्लेन मॅक्ग्राने 20.8 च्या सरासरीने ही कामगिरी केली होती. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)