IND vs AUS : शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या जोडीने मोडलं 22 वर्षे जुना रेकॉर्ड, काय केलं ते वाचा
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. 5 गडी गमवून 399 धावा केल्या आणि विजयासाठी 400 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली खेळी केली.
1 / 6
केएल राहुल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 50 षटकात 5 गडी गमवून 399 धावा केल्या. वनडे क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा सर्वात मोठा स्कोअर आहे.
2 / 6
शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. दोघांनी शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दुसऱ्या गड्याासाठी दोघांनी 200 धावांची भागीदारी केली.
3 / 6
शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी 200 धावांची भागीदारी केली. 165 चेंडूत 200 धावा केल्या. या दोघांनी इंदुरमध्ये सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा 22 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.
4 / 6
सचिन आणि लक्ष्मणने 2001 मध्ये इंदुरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 199 धावांची भागीदारी केली होती. आता 22 वर्षानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी 200 धावांची भागीदारी केली आहे.
5 / 6
देशांतर्गत मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यातील सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. 2023 मध्ये शुबमन गिल-श्रेयस अय्यर 200, 2001 मध्ये सचिन-लक्ष्मण 199 आणि 2019 मध्ये रोहित-धवन 193 धावांची भागीदारी केली आहे.
6 / 6
शुबमन गिल याने वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच 200 धावांची भागीदारी केली आहे. श्रेयस अय्यर त्याला उत्तम साथ मिळाली. यापूर्वी 2023 मध्ये श्रेयस अय्यरने 7 वेळा शतकी भागीदारी केली आहे. (सर्व फोटो - BCCI Twitter)