IND vs AUS: रोहितच्या कसोटी कारकिर्दीत 2193 दिवसांनंतर एक विचित्र योग जुळून आला, झालं असं की..
कर्णधार रोहित शर्माने एडलेडमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात 2193 दिवसानंतर मधल्या फळीत फलंदाजी केली. त्याची ही खेळी काही खास राहिली नाही. पण सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एक विचित्र योग मात्र जुळून आला आहे.
1 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा डे नाईट सामना असून एडलेडमध्ये सामना आहे. पिंक बॉलचा सामना करताना फलंदाजांची कसोटी लागली आहे. त्यात भारताचा डाव अवघ्या 180 धावांवर आटोपला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत 2193 दिवसानंतर एक विचित्र योग जुळून आला.
2 / 6
कर्णधार रोहित शर्मा 2193 दिवसानंतर मधल्या फळीत फलंदाजीसाठी आला होता. यापूर्वी रोहित शेवटचा मधळ्या फळीत खेळण्यासाठी एडलेडच्या मैदानावर उतरला होता. 2018 साली रोहित शर्माने मधल्या फळीत शेवटची फलंदाजी केली होती.
3 / 6
रोहित शर्मा 2018 साली विराट कोहलीच्या नेतृत्वात एडलेडमध्ये खेळला होता. या सामन्यात केएल राहुल आणि मुरली विजयने सलामी दिली होती. तर रोहित शर्मा मधल्या फळीत उतरला होता.
4 / 6
2018 साली सामना 6 डिसेंबरलाच झाला होता. तेव्हा रोहितने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. म्हणजेच आजपासून 2193 दिवसांपूर्वी मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरला होता.
5 / 6
2018 साली झालेल्या कसोटीत रोहित शर्माने पहिल्या डावात 37, तर दुसऱ्या डावात 1 धावा केली होती. तसेच भारताचा 31 धावांनी पराभव झाला होता. तर आता सुरु असलेल्या कसोटीत रोहित शर्मा पुन्हा फेल गेला आहे. त्याला फक्त 3 धावा करता आल्या.
6 / 6
डे नाईट कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर भारताला धक्का बसला. यशस्वी जयस्वाल गोल्डन डकवर बाद झाला.त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिलने डाव सावरला. पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा पहिला डाव 180 धावांवर आटोपला.