IND vs AUS: यशस्वी जयस्वालने शून्यावर बाद होत नोंदवला नकोसा विक्रम, कायमस्वरूपी राहणार डाग
पर्थमध्ये शतकी खेळी करणारा यशस्वी जयस्वाल दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फेल गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. तसेच कायमस्वरूपी नकोसा विक्रम आपल्या नावावर नोंदवून गेला.
1 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डे नाईट कसोटी सामना एडलेडमध्ये सुरु आहे. या सामन्यातील पहिल्याच डावात पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वाल बाद झाला. गोल्डन डकवर बाद झाल्याने त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
2 / 6
कसोटी कारकिर्दित यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच गोल्डन डकवर बाद झाला आहे. यशस्वी जयस्वाल तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. पण सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची ही पहिलीची वेळ आहे.
3 / 6
पिंक बॉल कसोटीत पहिल्याच चेंडूवर बाद होणारा यशस्वी जयस्वाल हा जगातील तिसरा आणि भारताचा पहिलाच फलंदाज आहे. 2017 मध्ये हॅमिल्टन मसाकादझा आणि 2021 मध्ये जॅक क्रॉली पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते.
4 / 6
डे-नाईट टेस्टमध्ये गोल्डन डकवर बाद होणारा यशस्वी जयस्वाल दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी आर अश्विन 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत पहिल्या चेंडूवर बाद झाला होता.
5 / 6
आतापर्यंत चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, अश्विन, उमेश यादव पिंक कसोटीत शून्यावर बाद झाले आहेत. आता या यादीत यशस्वी जयस्वालचा समावेश झाला आहे.
6 / 6
यशस्वी जयस्वालकडून ॲडलेड कसोटीत पुनरागमन अपेक्षित आहे. कारण जयस्वाल पर्थ कसोटीतही शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात 161 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिली कसोटी 295 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली.