Cheteshwar Pujara | चेतेश्वर पुजाराची इंदूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झुंजार अर्धशतक

| Updated on: Mar 02, 2023 | 8:07 PM

चेतेश्वर पुजारा याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाला इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे आव्हान देता आलेले आहे.

1 / 5
चेतेश्वर पुजारा याला टीम इंडियाचा तारणहार का म्हटलं जातं, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय. टीम इंडिया अडचणीत असताना पुजारा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या इंदूर कसोटीत झुंजार अर्धशतक ठोकलं.

2 / 5
टीम इंडिया इंदूर कसोटीत 88 धावांनी पिछाडीवर होती. तसेच टीम इंडियाने दुसऱ्या डावात झटपट विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. मात्र पुजाराने एक बाजू लावून धरली. त्यामुळेच टीम इंडियाचा दुसऱ्या दिवशी होणारा पराभव टळला, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.

3 / 5
पुजाराचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं हे 11 वं अर्धशतक ठरलं. पुजारा अर्धशतकानंतर संयमाने खेळत होता. मात्र नॅथन लायनच्या बॉलिंगवर लेग स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथ याने एकहाती अफलातून कॅच घेतला.  पुजारा 59 धावा करुन माघारी परतला.

4 / 5
या अर्धशतकी खेळीसह पुजाराने दुसऱ्या डावातील कारानामा कायम ठेवला. पुजाराने 2021 पासून पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात दुप्पट सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये  1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

5 / 5
पुजाराला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सुरु मालिकेत आतापर्यंत विशेष कामगिरी करता आलेली नाही. या अर्धशतकाआधी पुजाराने 4 डावात 39 धावाच केल्या आहेत. दरम्यान ऑस्टेलियाला इंदूर कसोटीत विजयासाठी 76 धावांचे आव्हान आहे.