IND VS AUS | टीम इंडियाची बादशाहत धोक्यात, ऑस्ट्रेलिया रोहितसेनेची घोडदौड थांबवणार?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेमधील तिसरा सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आता हा तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेसह मोठा रेकॉर्ड कायम ठेवण्याची संधी आहे.
1 / 5
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा सामना हा खेळवण्यात येत आहे. चेन्नईतील सामना जिंकणारी टीम सीरिजही जिंकेल. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक आहे.
2 / 5
टीम इंडियासाठी ही एकदिवसीय मालिका फार महत्वाची आहे. या मालिकेत टीम इंडियाचं प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही संघात वनडे क्रिकेटमधील एक नंबर होण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे. तर टीम इंडियासमोर अव्वल स्थान कायम ठेवण्याचं आव्हान आहे.
3 / 5
टीम इंडियाने मायदेशात अर्थात भारतात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडियाला कुणीच गेल्या 5 वर्षात भारतात धुळ चारु शकलेला नाही. टीम इडिंयाने गेल्या 5 वर्षात 7 एकदिवसीय मालिका खेळलेल्या आहेत. भारतात झालेल्या सातही सीरिज टीम इंडियाने जिंकल्या आहेत. तर आता टीम इंडियाचं आठव्यांदा सीरिज जिंकण्याकडे लक्ष आहे.
4 / 5
टीम इंडियाला भारतातला अखेरचा एकदिवसीय मालिका पराभव हा 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारावा लागला होता. उभयसंघात 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत होती. मात्र पाचवा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली होती. टीम इंडियाचा हा भारतातला 4 वर्षातला पहिला मालिका पराभव ठरला.
5 / 5
मात्र आता टीम इंडियाला मालिका पराभवाचा धोका आहे. ऑस्ट्रेलियाने पुन्हा आपल्याला पराभूत करावं, असं कोणताही चाहता इच्छिणार नाही. त्यामुळे आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.