IND vs AUS : जोश हेझलवूडने विराट कोहलीची विकेट घेत नोंदवला मोठा विक्रम, काय केलं ते वाचा
गाबा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. जोश हेझलवूड आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 वेळा आमनेसामने आले. यावेळी हेझलवूडने विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम नोंदवला.
1 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे. गाबा कसोटीत विराट कोहलीकडून भारतीय क्रीडाप्रेमींना अपेक्षा होता. पण 3 धावा करताच जोश हेझलवूडचा शिकार ठरला. या विकेटसह जोश हेझलवूडने एका विक्रमाची नोंद केली आहे.
2 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विकेटसह त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
3 / 5
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदी आणि विराट कोहली 39 वेळा आमनेसामने आले. यात कोहलीला 3 वेळा, वनडेत 7 वेळा आणी टी20 एकदा बाद केलं आहे. 11 वेळा टिम साउदीने त्याला बाद केलं आहे.
4 / 5
जोश हेझलवूडनेही विराट कोहलीला 11 वेळा बाद केलं आहे. पण कमी सामन्यात बाद केल्याने या यादीत अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने 30 सामन्यात हेझलवूडच्या 495 चेंडूंचा सामना केला आणि 11 वेळा विकेट देऊन बसला.
5 / 5
क्रिकेटविश्वातील महान खेळाडूला इतक्या वेळा बाद करण्याचा मान जोश हेझलवूडच्या नावावर आहे. विशेष म्हणजे विराट कोहली आणि जोश हेझलवूड आयपीएलमध्ये आरसीबीकडून एकत्र खेळणार आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये हेझलवूडचा सामना करावा लागणार नाही.