विराट कोहली मेलबर्न कसोटीत रचणार विक्रम, सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डमध्ये इतकाच फरक
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. त्याला यासाठी फक्त 134 धावांची आवश्यकता आहे.
1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे.
2 / 5
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांच्या सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. या मैदानावर सचिन तेंडुलकर एकूण 10 डाव खेळला असून 449 धावा केल्या आहेत.
3 / 5
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे आहे. रहाणेने मेलबर्नवर खेळलेल्या सहा डावात 369 धावा केल्या आहेत. या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
4 / 5
विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेलबर्न एमसीजी मैदानावर 6 डाव खेळले आहेत. यात त्याने 1 शतक आणि दोन अर्धशतक झळकावली आहेत. यात त्याने 316 धावा केल्या आहेत.
5 / 5
मेलबर्न कसोटी सामन्यातील दोन डावात विराट कोहलीने 134 धावा केल्यास अव्वल स्थानी पोहोचेल. एकाच वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे यांना मागे टाकेल.