वॉशिंग्टनची सुंदर खेळी, नितीशला साथ देत ठोकलं अर्धशतक; ऑस्ट्रेलियाची हवा काढली
टीम इंडिया संकटात असताना नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबरदस्त खेळी केली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरला. आठव्या विकेटसाठी 125 हून अधिक धावांची भागीदारी केली.
1 / 5
नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने ऑस्ट्रेलियाचे सर्व मनसुबे उधळून लावले. एकीकडे भारतावर फॉलोऑन आणि पराभवाचं संकट असताना त्यातून बाहेर काढलं. नितीश कुमार रेड्डीला वॉशिंग्टन सुंदर चांगली साथ दिली. 146 चेंडूत एका चोकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
2 / 5
ऑस्ट्रेलियात कसोटीच्या एकाच डावात भारताच्या आठव्या आणि नवव्या फलंदाजाने ने 50 हून अधिका धावा केल्याचा हा दुसरा प्रसंग आहे. 2008 मध्ये ॲडलेडमध्ये पहिल्यांदा अनिल कुंबळे (87) आणि हरभजन (63) यांनी 50 हून अधिक धावा केल्या होत्या.
3 / 5
इतकंच काय आठव्या आणि नवव्या फलंदाजाने 150 अधिक चेंडूंचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या कसोटी इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 150 हून अधिक चेंडूंचा सामना केला आहे.
4 / 5
नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 125 हून अधिक धावांची भागीदारी केली. आठव्या विकेटसाठी केलेली भागीदारी खूपच महत्त्वाची ठरली. भारतावर फॉलोऑनचं संकट असताना केलेली खेळी कायम स्मरणात राहील.
5 / 5
नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर प्रत्येक धावांसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघडी कमी करत आहे. क्रीडाप्रेमी त्यांच्या खेळीने प्रचंड खूश आहेत. ही जोडी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलिायने सर्व अस्त्र वापरली पण त्यात काही यश आलं नाही. आठव्या विकेटसाठी सचिन-हरभजनमध्ये 2008 मध्ये 129 ची भागीदारी झाली होती. त्यानंतर 2024मध्ये नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरने 127 धावांची भागीदारी केली. 2008 मध्ये एडलेडमध्ये कुंबले-हरभजनने 107 धावांची भागीदारी केली होती.