IND vs AUS : सिडनी कसोटीत दिसणार गुलाबी रंगाची छटा, असं करण्यामागे खास कारण

| Updated on: Jan 02, 2025 | 5:05 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीत होत आहे. या सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मालिका वाचण्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप अंतिम फेरीच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर होणार आहे. 3 जानेवारीपासून हा सामना होणार आहे. या सामन्यात गुलाबी रंगाची एक वेगळी छटा क्रीडारसिकांना पाहता येणार आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडू खास गुलाबी बॅगी कॅप्स घालणार आहेत.

2 / 5
वर्षाच्या सुरुवातील खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याला गुलाबी कसोटी म्हंटलं जातं. कारण या सामन्यात खेळाडू गुलाबी रंगाच्या टोप्या परिधान करतात. स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध जनजागृती करणे आणि त्याविरुद्ध लढणाऱ्यांना हिंमत देणे हा त्याचा उद्देश आहे.

3 / 5
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅक्ग्रा याने ही मोहीम सुरू केली होती. मॅक्ग्राची पत्नी जेन मॅकग्रा यांचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झालं आहे. त्यानंतर, ग्लेन मॅक्ग्राने मॅकग्रा फाऊंडेशनची स्थापना केली आणि या कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला.

4 / 5
सिडनी क्रिकेटनेही दरवर्षी गुलाबी कसोटी सामन्याचे आयोजन करून या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. या सामन्यासाठी सिडनी स्टेडियमच्या गॅलरी गुलाबी रंगात सजवण्यात येणार आहेत. तसेच सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लेडीज स्टँडचे तात्पुरते नाव बदलून जेन मॅक्ग्रा स्टँड असे करण्यात येईल.

5 / 5
या सामन्यात खेळाडूंनी परिधान केलेल्या गुलाबी टोपीचाही लिलाव होणार आहे. मिळालेली रक्कम स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाईल.