IND vs AUS Final : केएल राहुलने मोडला द्रविडचा 20 वर्षे जुना रेकॉर्ड, वाचा काय ते
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया करो या मरोच्या स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट झटपट बाद केल्यानंतर आणखी विकेट घेण्याचा दबाव आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यावर पकड मिळवली आहे. पण विकेट गेल्या तर कमबॅक करणं कठीण होईल.
1 / 6
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 षटकात 240 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. भारताकडून केएल राहुलने 66, विराट कोहलीने 54, तर रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले.
2 / 6
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात केएल राहुलने 66 धावांची खेळी केली. तसेच संघाला सन्मानजनक स्कोअर उभा करून देण्यास मदत केली. फलंदाजीनंतर केएल राहुलने उत्कृष्ट यष्टिरक्षणही केलं.
3 / 6
केएल राहुलने मिचेल मार्शला विकेटच्या मागे झेल घेतला. मिचेल मार्शचा झेल घेताच केएल राहुलने राहुल द्रविडचा 20 वर्ष जुना विक्रम मोडला. पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
4 / 6
मिचेल मार्शचा झेल घेतल्यानंतर केएल राहुल याने राहुल द्रविडला मागे टाकले आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच पर्वात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे.
5 / 6
केएल राहुलने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये विकेटच्या मागे एकूण 17 झेल घेतले आहेत. 2003 वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविडने विकेटमागे 16 झेल घेतले होते.
6 / 6
केएल राहुलने या विश्वचषकात भारतासाठी पाचव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली. 11 सामन्यातील 10 डावांमध्ये 75.33 च्या सरासरीने 452 धावा केल्या.