IND vs AUS Final : राहुल द्रविड आणि चक दे इंडिया चित्रपटाचं काय कनेक्शन? सोशल मीडियावर रंगली चर्चा

| Updated on: Nov 18, 2023 | 6:11 PM

प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप 2023 ची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मागचं बरंच काही उकरून काढलं जात आहे. त्यात आता राहुल द्रविड यांची तुलना चक दे इंडिया चित्रपटातील कबीर खान या पात्राशी केलं जात आहे.

1 / 6
चक दे इंडिया या चित्रपटात शाहरूख खान याने हॉकी प्रशिक्षक कबीर खान ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाची चर्चा आजही होत आहे. महिला हॉकी संघाला जेतेपद जिंकून देण्यात कबीर खान याची मोलाची भूमिका असल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

2 / 6
प्रशिक्षक राहुल द्रविड चित्रपटाप्रमाणेच टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात एक पाऊल दूर आहे. चित्रपटात कबीर खान पराभव विसरला नसल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसंच 2007 वर्ल्डकप स्पर्धेत राहुल द्रविड याच्याकडे नेतृत्व होतं. बांगलादेश आणि श्रीलंकेकडून पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं.

3 / 6
राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 10 पैकी 10 सामने जिंकले असून स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. श्रीलंकेला 55 धावात गुंडाळत टीम इंडियाने वचपा काढला आहे.

4 / 6
सोशल मीडियावर राहुल द्रविड आणि चक दे चित्रपटातील कबीर खान या पात्राची तुलना केली जात आहे. दोघंही मोठ्या स्पर्धेत पराभूत झाले आणि  नंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेत परतले.

5 / 6
राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे कबीर खान आणि राहुल द्रविड यांच्यात जवळजवळ साम्य दिसत आहे. आता टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली आहे.

6 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. चक दे इंडियामधील अंतिम फेरीचा सामना देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता.