IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचे 5 धोकादायक खेळाडू, 2 निवृत्त तर 1 टीममधून आऊट

| Updated on: Sep 21, 2023 | 5:35 PM

India vs Australia Odi Series 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे.

1 / 5
वर्ल्ड कपआधीच्या या सीरिजनिमित्ताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या टीम इंडियाच्या 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाकडून सर्वाधिक एकदिवसीय धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 शतक आणि 15 अर्धशतकांसह सर्वाधिक 3 हजार 77 धावा केल्या आहेत.

2 / 5
दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा कर्णधार मुंबईकर रोहित शर्मा आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 शतकं आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 251 रन्स केल्या आहेत.

3 / 5
विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 44 डावांमध्ये 2 हजार 172 रन्स केल्या आहेत. यामध्ये 8 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

4 / 5
चौथ्या स्थानी महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीने  ऑस्ट्रेलिया विरुद्ध 48 डावांमध्ये 11 अर्धशतकं आणि 2 शतकांच्या मदतीने 1 हजार  660 धावा केल्या आहेत.

5 / 5
टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या यादीत शिखर धवन पाचव्या स्थानी आहे. धवनने 30 डावात 45.17 च्या सरासरीने 4 शतकं आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने  1 हजार 265 धावा केल्या आहेत.