IND vs AUS | टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, कोण वरचढ कोण कमजोर?
भारतीय क्रिकेट संघासाठी आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजचं महत्व फार वाढलंय.
1 / 5
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 मार्चपासून सुरु होणारी वनडे सीरिज टीम इंडियासाठी आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्वाची आहे. या निमित्ताने या दोन्ही संघांपैकी कोणाचा बोलबाला राहिलाय, हे आपण जाणून घेऊयात. उभय संघात आतापर्यंत 143 सामने खेळवण्यात आलेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 143 पैकी 80 सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवलाय. तर टीम इंडियाने 53 वेळा कांगारुंवर मात केलीय. तर 10 सामने टाय राहिलेत.
2 / 5
ऑस्ट्रेलियाची भारतातील आकडेवारीही जबरदस्त आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध भारतात 64 पैकी 30 सामन्यात विजय मिळवलाय. तर टीम इंडियाने 29 मॅचमध्ये कांगारुंना पाणी पाजलंय.
3 / 5
ऑस्ट्रेलियाने 43 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाला पहिल्या 30 वर्षात वरचढ होऊ दिलं नाही. या पहिल्या 30 वर्षात उभय संघात 104 सामने खेळवण्यात आले. यापैकी 61 वेळा ऑस्ट्रेलिया तर 35 सामन्यात टीम इंडिया विजयी झालीय. तर 8 सामने हे बरोबरीत सुटलेत.
4 / 5
टीम इंडियाने 2010 नंतर ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. दोन्ही टीममध्ये 2010 नंतर 39 सामने झालेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 19 तर टीम इंडियाने 18 मॅच जिंकल्या आहेत, तर 2 मॅच टाय राहिल्यात.
5 / 5
दरम्यान तब्बल 12 वर्षानंतर भारतात पुन्हा एकदा वनडे वर्ल्ड कपचं आयोजन होत आहे. या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त 14 सामनेच उरलेत. त्यामुळे या वर्ल्ड कपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचं महत्तव अधिक वाढलंय.