पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर, अशी आहे कॅप्टन्सीची आकडेवारी
रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी अनुपस्थित असणार आहे. त्यामुळे पर्थ कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असणार आहे. पण जसप्रीत बुमराहने यापूर्वी कर्णधारपद भूषवलं आहे का? कशी आहे त्याच्या नेतृत्वाची कारकिर्द जाणून घेऊयात
1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना पर्थमध्ये 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध नसेल. त्यामुळे संघाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वगुणांची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे.
2 / 5
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत त्याच्या क्रिकेट कारकिर्दित फक्त एकाच कसोटीत भारताचं नेतृत्व केलं आहे. जसप्रीत बुमराहने जुलै 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध संघाचं नेतृत्व केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 2021 मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या चार सामन्यानंतर करोना संकटामुळे शेवटचा कसोटी सामना 2022 मध्ये खेळवला गेला.
3 / 5
शेवटच्या कसोटी सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने संघाचं नेतृत्व केलं. इंग्लंडने हा सामना 7 गडी राखून जिंकला. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने सामना गमवला. पण या सामन्यात स्टूअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा ठोकल्या.
4 / 5
धर्मशाळा येथे 2023 झालेल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने नेतृत्व केलं होतं. रोहित शर्मा जखमी झाल्याने दुसऱ्या डावात नेतृत्व करण्याची वेळ आली. हा सामना भारताने एक डाव आणि 64 धावांनी जिंकला होता.
5 / 5
ऑगस्ट 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली होती. या मालिकेचं नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे होतं. ही मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली. तिसरा सामना पावसामुळे होऊ शकला नाही.