IND vs AUS : विराट कोहली एका शतकासह 9 खेळाडूंचा विक्रम मोडणार, काय ते जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरु होत आहे. हा डे नाईट कसोटी सामना असल्याने फलंदाजांची कसोटी लागणार आहे. पिंक बॉलचा सामना करताना फलंदाजांना अडचण येते हा आतापर्यंतचा अनुभव आहे. असं असताना पिंक बॉल कसोटीत विराट कोहलीला एका मोठ्या विक्रमाची नोंद करण्याची संधी आहे.
1 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया पिंक बॉल कसोटी सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दुसरा सामना ॲडलेड येथील ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकल्याने मोठा विक्रम त्याच्या नावावर होईल. (Photo- BCCI Twitter)
2 / 6
ॲडलेड ओव्हलवर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत किंग कोहली सध्या दहाव्या स्थानावर आहे. विराट कोहली या मैदानावर 4 कसोटी सामने खेळला आहे. यात विराट कोहलीने एकूण 3 शतके झळकावली आहेत.(Photo- BCCI Twitter)
3 / 6
मार्नस लाबुशेन, जॅक हॉब्स, डॉन ब्रॅडमन, डीन जोन्स, आर्थर मॉरिस, बॉब सिम्पसन, मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर आणि स्टीव्ह वॉ यांनीही ॲडलेड ओव्हलवर प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत.
4 / 6
ॲडलेड शतकवीरांच्या यादीत 10व्या क्रमांकावर असलेला विराट कोहली गुलाबी चेंडूच्या कसोटीत शतक ठोकल्यास अव्वल स्थानावर पोहोचू शकतो. यासह विराट कोहली ऑस्ट्रेलियातील ओव्हल मैदानावर सर्वाधिक कसोटी शतक झळकावणारा फलंदाज ठरणार आहे. (Photo- BCCI Twitter)
5 / 6
या सामन्यात विराट कोहलीने 102 धावा केल्या तर ॲडलेड ओव्हल मैदानावर विदेशी खेळाडूकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. सध्या हा विक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा (610 धावा) याच्या नावावर आहे.(Photo- BCCI Twitter)
6 / 6
विराट कोहलीला ब्रायन लाराचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 102 धावांची गरज आहे. कोहलीने 2012-2020 दरम्यान ॲडलेडमध्ये 8 कसोटी डाव खेळले आहेत आणि एकूण 509 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)